प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात आज दोन नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. मुंबईतील विक्रोळीहून चार दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे आलेल्या 30 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झालीय. त्याच्याबरोबरच्या दुसऱ्या एकाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. तर कडेगाव तालुक्यातील भिकवडीच्या 10 वर्षीय मुलालाही कोरोनाची बाधा झालीय. तो काही दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथून आला आहे.
मिरजेच्या कोरोना रुग्णालयात या युवकावर उपचार सुरु आहेत. आज दोन रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात एकूण कोरणा रुग्णांची संख्या 45 झाली आहे. सध्या उपचारात 13 रुग्ण आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. या युवकाच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने संस्था अलगिकरण कक्षात नेण्यात आले आहे