कोरोनाबाधितेच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य कोरोनाबाधित
प्रतिनिधी/सांगली
शिराळा तालुक्यातील निगडी येथील कोरोना बाधित महिलेच्या कुटुंबातील पाच सदस्यांपैकी चार सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तर एक सदस्य कोरोना बाधितेची आईचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात दोन कोरोणाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर मिरज येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात एकूण 28 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. यातील 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.