870 कोरोनामुक्तः मनपा क्षेत्रात 216 वाढलेः ग्रामीण भागात 1079 रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. विक्रमी रूग्ण वाढले आहेत. नवे एक हजार 395 रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात मृत्यूचे तांडव वाढतच चालले आहे जिल्ह्यात मंगळवारी 24 जणांचा मृत्यू झाला आहे.महापालिका क्षेत्रात 216 तर ग्रामीण भागात तब्बल एक हजार 79 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 870 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारात 12 हजार 245 रूग्ण आहेत..
महापालिका क्षेत्रात 216 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठÎाप्रमाणात वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 216 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 126 तर मिरज शहरात 90 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 21 हजार 800 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 74 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात 1079 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. जिल्हÎातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. रूग्ण आटोक्यात येण्याची कोणतीही चित्र दिसून येत नाही. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. आटपाडी तालुक्यात 110 तर कडेगाव तालुक्यात 84 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 246 तर पलूस तालुक्यात 60 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 88 तर जत तालुक्यात 106 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 69, मिरज तालुक्यात 142 रूग्ण वाढले. शिराळा तालुक्यात 101 तर वाळवा तालुक्यात 173 रूग्ण वाढले आहेत.
24 जणांचे मृत्यू
जिल्ह्यात मंगळवारी 24 जणांचे मृत्यू झाले आहेत. महापालिका क्षेत्रात तब्बल सहा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील 2 आणि मिरज शहरातील एक आणि कुपवाड शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात एक तर कडेगाव तालुक्यात एक आणि खानापूर तालुक्यात तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात एक तर तासगाव तालुक्यात तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यात तीन तर मिरज तालुक्यात एक तर वाळवा तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
तब्बल 870 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 870 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 71 हजार 727 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 57 हजार 515 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज लसीकरण होणार नाही
जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध नसल्याने बुधवारी कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली आहे. जिल्ह्यात आजअखेर पाच लाख 36 हजार 81 नागरिकांना लस देण्यात आली आहे. बुधवारी शासनाकडून लस प्राप्त झाल्यानंतरच गुरूवारी लसीकरण केले जाणार आहे.
नवे रूग्ण 1395
उपचारात 12245
बरे झालेले 57515
एकूण 71927
मृत्यू 2167
मंगळवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 110
कडेगाव 84
खानापूर 246
पलूस 60
तासगाव 88
जत 106
कवठेमहांकाळ 69
मिरज 142
शिराळा 101
वाळवा 173
सांगली शहर 126
मिरज शहर 90
एकूण 1395
आजचे लसीकरण 5550
एकूण लसीकरण 536081