सांगली जिल्ह्यातील 13 जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 47 वाढलेः ग्रामीण भागात 267 वाढले
प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्ह्या त नवीन 314 रूग्ण आढळून आले आहेत. तर 529 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना जिल्हÎातील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर परजिल्हÎातील दोघांचा मृत्यू झाला. जिल्हÎातील आजअखेर दीड हजार रूग्णांचा बळी गेला आहे. जिल्हÎात एकूण रूग्णसंख्या 40 हजार 644 झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या 34 हजार 313 आहे.
महापालिका क्षेत्रात अवघे 47 रूग्ण वाढले
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात शुक्रवारी अवघे 47 नवीन रूग्ण वाढले आहे. मनपा क्षेत्रात रूग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे. ही मनपा क्षेत्राला दिलासा देणारी गोष्ट आहे. शुक्रवारी सांगली शहरात 34 आणि मिरज शहरात 13 नवीन रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 15 हजार 320 रूग्ण झाले आहेत. त्यातील 85 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 267 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णवाढीचा वेगही आता कमी झाला आहे. शुक्रवारी 267 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये तालुकानिहाय वाढलेले रूग्ण असे आटपाडी तालुक्यात 12, जत तालुक्यात 29, कडेगाव तालुक्यात 14 तर कवठेमहांकाळ तालुक्यात 11 नवीन रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 31, मिरज तालुक्यात 31, पलूस तालुक्यात 15 तर शिराळा तालुक्यात 36 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 19 आणि वाळवा तालुक्यात 69 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यात त आज अखेर दीड हजार रूग्णांचा बळी
जिल्हÎात शुक्रवारी उपचार सुरू असताना 13 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्हÎात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या आता दीड हजार झाली आहे. शुक्रवारी उपचार सुरू असताना सांगली शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. जत, खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णांचा मृत्यू झाला. कडेगाव तालुक्यातील एकाचा तर मिरज तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
परजिल्ह्यातील नऊ रूग्ण वाढले
परजिल्हÎातील रूग्णांच्यावरही जिल्हÎात उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवारी परजिल्हÎातील नऊ रूग्ण वाढले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हÎातील पाच जण, बेळगाव जिल्हÎातील दोन जण आणि सातारा जिल्हÎातील दोन जणांचा समावेश आहे. शुक्रवारी उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हÎातील एक आणि सांगोला येथील एकाचा समावेश आहे. आजअखेर परजिल्हÎातील एक हजार 256 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले त्यामध्ये 981 रूग्ण बरे झाले आहेत. तर 86 रूग्ण उपचाराखाली आहेत. आजअखेर 189 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तीन हजार 640 स्वॅब तपासले
जिल्हÎात शुक्रवारी तीन हजार 640 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये आरटीपीसी मध्ये एक हजार 345 जणांचे तर रॅपीड ऍण्टीजनमध्ये दोन हजार 295 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 314 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
शुक्रवारी 529 रूग्ण कोरोनामुक्त
जिल्हÎात शुक्रवारी 529 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हÎात आजअखेर 34 हजार 313 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गेल्या 20 दिवसापासून वाढणाऱया रूग्णापेक्षा कोरोनामुक्त होणाऱया रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे उपचाराखाली असणाऱया रूग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे. सध्या उपचारात चार हजार 861 रूग्ण आहेत.
नवीन रूग्ण 314
उपचाराखालील 4831
बरे झालेले 34313
एकूण रूग्ण 40644
आजअखेर मृत्यू 1500