कोरोनामुक्त १२६२ : मनपाक्षेत्रात १५८ तर ग्रामीण भागात १३१० वाढले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सोमवारी एकाच दिवशी जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक असे नवे एक हजार 568 रूग्ण वाढले तर उच्चांकी 40 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 158 तर ग्रामीण भागात तब्बल एक हजार 310 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणार एक हजार 262 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारात 13 हजार 861 रूग्ण आहेत..
मनपाक्षेत्रात 158 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली 90 तर मिरज शहरात 68 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 23218 रूग्ण आढळून आले आहेत. उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
40 जणांचा मृत्यू
महापालिका क्षेत्रात सांगली शहरात तीन मिरज शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी, जत एक, कडेगाव तालुक्यात चार, खानापूर नऊ, मिरज, तासगाव सहा, कवठेमहांकाळ, शिराळा दोन आणि वाळवा तालुक्यात चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
1262 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 1262 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 79 हजार 911 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 63 हजार 662 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज लसीकरण होणार नाही
जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने मंगळवारी कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली आहे.
नवे रूग्ण 1568 उपचारात 13861 बरे झालेले 63662 एकूण 79911 मृत्यू 2388 |
सोमवारचे बाधित रूग्ण तालुका रूग्ण आटपाडी 191 कडेगाव 96 खानापूर 224 पलूस 83 तासगाव 163 जत 99 कवठेमहांकाळ 45 मिरज 218 शिराळा 131 वाळवा 160 सांगली शहर 90 मिरज शहर 68 एकूण 1568 आजचे लसीकरण 00 एकूण लसीकरण 563922 |