प्रतिनिधी / सांगली
कोरोनाबाबतचे उपचार आणि पुढील सर्व यंत्रणेच्या दृष्टीने रॅपिड टेस्ट महत्त्वाच्या असून वेळेत उपचार होण्यासाठी रॅपिड टेस्ट महत्त्वाची आहे. जिल्ह्यात 20,000 रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी रविवारी सांगलीत पत्रकार बैठकीत दिली. सांगली-मिरज-कुपवाड या महापालिका क्षेत्रात 10 हजार आणि ग्रामीण भागात 10 हजार रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहेत असेही ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ले करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ‘कंटेनमेंट झोन’चा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न, तसा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाकडून त्याबाबतचे आदेश प्राप्त झाल्यास पुढील कार्यवाही करता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.