265 कोरोनामुक्त,सांगली शहरात 76 वाढले, कडेगाव आणि वाळवा तालुक्यात 100 पेक्षा अधिक रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. मंगळवारी तर जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी तर गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक असे 657 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात 76 तर मिरज शहरात 66 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 265 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात चार हजार 431 रूग्ण आहेत. तर वाळवा आणि कडेगाव तालुक्यात तब्बल 100 पेक्षा अधिक रूग्ण वाढले आहेत.
महापालिका क्षेत्रात 142 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात सातत्याने रूग्ण वाढताना दिसून येत आहेत. मंगळवारी तर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सांगली शहरात 76 तर मिरज शहरात 66 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 19 हजार 30 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 82 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात 515 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. ग्रामीण भागात तर तब्बल 515 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कडेगाव आणि वाळवा तालुक्यात सर्वाधिक असे रूग्ण आढळून आले आहेत. कडेगाव मध्ये 105 तर वाळवा तालुक्यात 103 रूग्ण वाढले आहेत. आटपाडी तालुक्यात 45 रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात 33, कवठेमहांकाळ तालुक्यात 11, मिरज तालुक्यात 38 तर शिराळा तालुक्यात 47 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 62 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 35 तर तासगाव तालुक्यात 36 रूग्ण वाढले आहेत.
दहा जणांचा मृत्यू
दहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये जत तालुक्यातील एकाचा तर मिरज तालुक्यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरात एक तर मिरज शहरात दोन रूग्ण दगावले आहेत. तर वाळवा तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुका, पलूस आणि तासगाव तालुक्यात प्रत्येकी एक रूग्ण दगावला आहे. आजअखेर एक हजार 862 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.65 टक्के झाला आहे.
265 कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 265 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 56 हजार 737 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 50 हजार 444 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 657
उपचारात 4431
बरे झालेले 50444
एकूण 56737
मृत्यू 1862
मंगळवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 45
कडेगाव 105
खानापूर 62
पलूस 35
तासगाव 36
जत 33
कवठेमहांकाळ 11
मिरज 38
शिराळा 47
वाळवा 103
सांगली शहर 76
मिरज शहर 66
एकूण 657
लसीकरण
आजचे लसीकरण 13832
आजअखेर लसीकरण 322696