प्रतिनिधी / सांगली
मंगळवारी जिल्हय़ात नवीन 311 रूग्ण वाढले तर 230 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 22 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 19 जणांचा आणि परजिल्हय़ातील तिघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 249 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान कुपवाड येथील नगरसेवक कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
महापालिका क्षेत्रात 124 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात मंगळवारी 124 रूग्ण वाढले. त्यामध्ये सांगली शहरात 76 तर मिरज शहरात 48 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात मंगळवारी सोमवारपेक्षा कमी रूग्ण आढळून आले आहेत. सध्या जे रूग्ण वाढत आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले त्यांचे नातेवाईक आहेत. तसेच रूग्णांच्याबरोबरचे सहकारी आहेत. नवीन रूग्ण हे विश्रामबाग, शंभरफुटी, हनुमाननगर, गावभाग, खणभाग, शामरावनगर, एमएसईबी रोड, गर्व्हेमेंट कॉलनी, विजयनगर , शिंदे मळा, सांगलीवाडी, अभयनगर, सहय़ाद्रीनगर, गुलमोहोर कॉलनी, हरीपूर रोड या भागातील हे रूग्ण आहेत. तर मिरजेत जे रूग्ण आढळून आले आहेत. ते गावठाणसह विविध उपनगरातील आहेत. भारतनगर, इंदिरानगर, बेथेलहेमनगर, मंगळवार पेठ, नदीवेस याठिकाणी आढळून आले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या चार हजार 216 झाली आहे.
ग्रामीण भागात 187 रूग्ण वाढले
मंगळवारी ग्रामीण भागात मात्र महापालिकेपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 26, जत तालुक्यात चार, कडेगाव तालुक्यात 14 रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात आठ, खानापूर तालुक्यात 15, मिरज तालुक्यात 27 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 43, शिराळा तालुक्यात 25, तासगाव तालुक्यात 15 आणि वाळवा तालुक्यात 10 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 187 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 19 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 19 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 82, 66 आणि 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर 55 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिरजेतील चार व्यक्तीचा मृत्यू झाला त्यामध्ये 52, 66 आणि 70 वर्षीय व्यक्तीचा तसेच 62 वर्षीय महिलेचा मिरज कोरोना रूग्णालयात येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुपवाड येथील 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील बागणी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला मसुची वाडी येथील 65 वर्षीय महिलेचा प्रकाश हॉस्पिटल येथे तर तांदुळवाडी येथा 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मिरज तालुक्यातील मालगाव येथील 52 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. बामनोळी येथील 76 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे तर गुंडेवाडी येथील 24 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील धनगाव येथील 58 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. कुंडल येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. शिराळा तालुक्यातील इंगरूळ येथील 60 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. तासगाव येथील 71 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.
या 19 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 249 झाली आहे. परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील शिरोळ येथील 48 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. अलास येथील 60 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये तर सातारा जिल्हय़ातील खटाव येथील 57 वर्षीय महिलेचा ओम श्री हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 70 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
मंगळवारी 230 जण कोरोनामुक्त
मंगळवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे तब्बल 230 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग सातव्या दिवशी मोठय़ासंख्येने रूग्ण बरे झाल्याने रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या तीन हजार 806 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
कुपवाडचे नगरसेवक मगदूम कोरोनाबाधित
कुपवाड येथील नगरसेवक गजानन मगदूम यांनी स्वःत ऍण्टीजन टेस्ट करून घेतल्यानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी स्वतःहून सांगितले.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 7075
बरे झालेले 3806
उपचारात 3020
मयत 249