नवे 1077 : 43 मृत्यू : एकूण रूग्णसंख्या लाखापेक्षा अधिक
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात रविवारी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा लाखाच्या पार झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाची एंट्री होऊन 415 दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात एक लाख 383 लोक बाधित झाले आहेत. रविवारी नवीन एक हजार 77 बाधित आढळून आले तर एक हजार 793 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला फार मोठा दिलासा मिळाला आहे. उपचार सुरू असताना 43 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या उपचारात 16 हजार 226 रूग्ण आहेत.
मनपाक्षेत्रात 165 वाढले
महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा थोडा-थोडा कमी होत चालला आहे. रविवारी महापालिका क्षेत्रात 165 रूग्ण आढळून आले त्यामध्ये सांगली शहरात 108 तर मिरज शहरात 57 इतके रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 25 हजार 796 रूग्ण बाधित झाले आहेत. त्यातील 75 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीणभागात 912 रूग्ण वाढले आहेत
महापालिका क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना आता आटोक्यात येऊ लागला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्येचा आकडा वाढतच होता आता तो स्थिरावला आहे. लवकरच तो आणखी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यासाठी हा एक दिलासा आहे. एकाच दिवशी ग्रामीण भागात 912 रूग्ण वाढले आहेत. आटपाडी तालुक्यात 68, कडेगाव तालुक्यात 50, खानापूर तालुक्यात 70, पलूस तालुक्यात 33, तर तासगाव तालुक्यात 181 रूग्ण आढळून आले आहेत. जत तालुक्यात 118, कवठेमहांकाळ तालुक्यात 38, मिरज तालुक्यात 150 तर शिराळा तालुक्यात 43 आणि वाळवा तालुक्यात 131 रूग्ण आढळून आले आहेत.
43 जणांचे मृत्यू
जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण मात्र अद्यापही कमी होताना आढळून येत नाही. रविवारी उपचार सुरू असणाऱया 43 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सांगली शहरातील सहा तर मिरज शहरातील एक तर कुपवाड शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कडेगाव आणि खानापूर तालुक्यात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात चार जणांचा तर तासगाव तालुक्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक जणांचा तर मिरज तालुक्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यात एक जणांचा तर वाळवा तालुक्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
1793 कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱया रूग्णांच्या संख्येतही मोठयाप्रमाणात वाढ होत चालली आहे. ही जिल्ह्यासाठी चांगलीच दिलासा देणारी गोष्ट आहे. रविवारी उपचार सुरू असणारे एक हजार 793 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर 81 हजार 235 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
नवे रूग्ण 1077
उपचारात 16226
बरे झालेले 81235
एकूण बाधित 100373
मृत्यू 2922
रविवारचे तालुकानिहाय बाधित रूग्ण
आटपाडी 98
कडेगाव 50
खानापूर 70
पलूस 33
तासगाव 181
जत 118
कवठेमहांकाळ 38
मिरज 150
शिराळा 43
वाळवा 131
सांगली शहर 108
मिरज शहर 57
एकूण 1077
आजचे लसीकरण 1122
आजअखेर लसीकरण 648069