प्रतिनिधी / सांगली
शनिवारी जिल्हय़ात 156 नवीन रूग्ण वाढले. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रात 92 तर ग्रामीण भागात 64 रूग्ण वाढले आहेत. तर 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या 2799 झाली आहे. उपचारातील रूग्णसंख्या 1443 आहे. जिल्हय़ात तब्बल 12 जणांचा कोरोनाने उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील बळींची संख्या 90 वर पोहचली आहे.
सांगली-मिरजेत रूग्णांची संख्या घटली
गेल्या आठ दिवसापासून सातत्याने महापालिका क्षेत्रात 100 हून अधिक रूग्ण आढळून येत होते. पण शनिवारी ही रूग्णसंख्या फक्त 92 वाढली आहे. यामध्ये सांगली शहरात 70, मिरज शहरात 19 आणि कुपवाड शहरात तीन रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरातील खणभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. खणभागातील शेवाळे गल्ली, म्हसोबा गल्ली, नगारजी गल्ली, पाथरवट गल्ली यामध्ये मोठयाप्रमाणात रूग्ण आढळून आल्याने या गल्ल्या बंद करण्यात आल्या आहेत. सांगली शहरातील गणेशनगर, कोल्हापूर रोड, सांगलीवाडी, पवार प्लॉट, रूक्मिणी नगर, वखारभाग, हडको कॉलनी, पत्रकार नगर, हसनी आश्रम, सूर्यवंशी प्लॉट, संजयनगर, विश्रामबाग, विजयनगर, चांदणी चाक, आमराई रोड, गावभाग येथील रूग्ण आहेत. मिरज शहरात वंटमुरे कॉर्नर, अमननगर, खतीबनगर, पंढरपूर रोड मिरज हॉस्टेल, या भागातील रूग्ण आहेत. तर कुपवाड मधील रामकृष्णनगर येथे रूग्ण आढळून आले आहेत. स्वॅब घेण्यात आले त्यामध्ये महापालिका क्षेत्रात 78 रूग्ण आढळून आले होते. तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये 12 रूग्ण आढळून आले आहेत. तर दोघांनी खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली आहे.
ग्रामीण भागात 64 रूग्ण आढळून आले
कडेगाव तालुक्यातील आसद येथे पाच नेर्ली येथे एक आणि कडेगाव शहरात एक रूग्ण आढळून आले आहेत. मिरज तालुक्यात हरिपूर येथे एक माधवनगर येथे 11 बामनोली येथे एक मालगाव येथे एक आणि कसबे डिग्रज येथे पाच रूग्ण आढळून आले आहेत. जत तालुक्यात बाज् येथे एक आणि जत शहरात एक नवीन रूग्ण आढळून आला. कवठेमहांकाळ तालुक्यात कुकटोळी येथे एक, कवठेमहांकाळ शहरात तीन, झुरेवाडी येथे एक घाटनांद्रे येथे एक बोरगाव येथे तीन रूग्ण वाढले आहेत. तर आटपाडी शहरात तीन रूग्ण वाढले आहेत. तासगाव शहरात आठ, मणेराजुरीमध्ये तीन निमणी येथे चार आणि नेहरूनगर येथे दोन रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात सुरूल येथे एक खानापूर येथे एक शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील एक शिराळा शहरात एक रूग्ण वाढला.
महापालिकेचे कर्मचारी बाधित
शनिवारी सांगली शहरातील महापालिकेचे कर्मचारीही बाधित आढळून आले आहेत. तसेच मिरजेतील डॉक्टर हॉस्टेलमध्येही पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. याठिकाणी दोन डॉक्टर पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सांगली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्षही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्या पत्नीही पॉझिटिव्ह आल्या आहेत.
उपचारादरम्यान तब्बल 12 जणांचा मृत्यू
कोरोनाचे उपचार सुरू असताना सांगली शहरातील 62, 64, 44, 63 आणि 83 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील 82 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तासगाव येथील 64 वर्षीय व्यक्ती, मिरज येथील 78 वर्षीय व्यक्ती, मिरज तालक्यातील बेडग येथील 60 वर्षीय व्यक्ती , बुधगाव येथील 54 वर्षीय व्यक्ती आणि 63 वर्षीय व्यक्ती, जत येथील 30 वर्षीय व्यक्ती अशा तब्बल 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात एकूण 90 बळी गेले आहेत.
138 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ातील शनिवारी उपचार सुरू असणारे तब्बल 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 30 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 2799
बरे झालेले 1266
उपचारात 1443
मयत 90