केंद्रीय जीएसटी, सहायक आयुक्त किशोर गोहिल यांच प्रतिपादन
प्रतिनिधी / सांगली
पाच कोटी पेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणारे तसेच मासिक विवरणपत्र भरण्याचा पर्याय घेतलेले इतर करदाते यांनी फेब्रुवारी २०२१ चा कर भरणा व विवरणपत्र ३ बी सादर करण्याचे आवाहन केंद्रीय जीएसटी, सहाय्यक आयुक्त किशोर गोहिल यांनी केले. कर भरणा न केल्यास व्याज व दंडाची आकारणी करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच ज्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटींपेक्षा आत आहे आणि ज्यांनी तिमाही विवरणपत्र भरण्याचा पर्याय घेतला आहे अशांनी आपला फेब्रुवारी २१ चा कर २५ मार्च पर्यंत न भरल्यास व्याज लागण्याची माहितीही त्यांनी सांगितली.तसेच सर्व कर दात्यांना सुचित करण्यात येते की त्यांनी यापूर्वीची असलेली प्रलंबित विवरणपत्रे, कर भरणा, व्याज व इतर काही थकबाकी असेल त्यांनीही आपला थकीत कर भरणा हा ३१ मार्चपूर्वी करून विभागास सहकार्य करावे.
आर्थिक वर्षाच्या संपताना महसूल गोळा करण्याचे उद्देशाने अधिकारी कार्यरत आहेत. मात्र मागील २०१९-२० या आर्थिक वर्षात सुमारे ८१३ कोटीचा महसूल जमा झाला होता . आता एप्रिल २० ते फेब्रुवारी २१ या ११ महिन्यात तो ६९४ कोटी इतकाच आहे . मागील वर्षी इतका होण्यासाठी ११९ कोटींची गरज या महिन्यात आहे. जिल्ह्यातील केंद्र व राज्याकडे मिळून असलेल्या २५५०० कर दात्यांच्या सहकार्यातून कोरोना पार्श्वभूमीवर हे एक फार मोठे काम आहे.
अधिक माहितीसाठी जीएसटी विभागाचे अधीक्षक मकरंद कुलकर्णी, विजय खरात, जीएसटी सेवा केंद्राचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, प्रमोद कुशवाह हे कार्यरत आहेत.