कुपवाड / प्रतिनिधी
थकित बिलापोटी ग्राहकांच्या घरी जाऊन वीज कनेक्शन तोडणार्या महावितरण कंपनीच्या वायरमनला दमदाटी केल्याचा प्रकार मिरज तालुक्यातील तानंग येथे घडला. याप्रकरणी कुपवाड़ पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महावितरणचे सहायक अभियंता व त्यांच्या सहकार्यांना संबंधित ग्राहक व तीन महिलांनी दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्राहक संजय मोरे यासह अन्य तीन महिला मिळून चौघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचे सहायक अभियंता सचिन राजेंद्र सदामते व त्यांचे अन्य कर्मचारी तानंग येथे महावितरणच्या एक वर्षावरील थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी गेले होते. वसूली करीत असताना थकबाकीदाराने वेळेत बिल भरले नसल्यामुळे महावितरण अधिकार्यांनी संबंधित ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयित संजय मोरे व अन्य तीन महिला अशा चार जणांनी मिळून त्यांना दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी सहायक सदामते यांनी कुपवाड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे करीत आहेत.