कडेगाव / प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षकांना ध्येय उद्योग समूह, अहमदनगर यांचे तर्फे दिला जाणारा ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद शाळा, शिवणी
ता.कडेगाव. जि.सांगली. येथील शिक्षक श्री. तानाजी रामचंद्र देशमुख जाहीर झाला. ‘प्रयोगशील शिक्षक’ यासाठी त्यांची निवड केली. तानाजी देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना स्वतः चे असे अनेक नाविन्यपूर्ण यशस्वी उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये
मजेत शिकूया गणित, शेतीशाळा, कणाद प्रयोगशाळा परिसर भाग-1 निर्मिती व उपयोग, गणित बाग , औषधी वनस्पती संवर्धन, आहारातूनआरोग्यकडे 100%उपस्थिती चषक, इंग्रजी गणित किट रॅक मांडणी, कुपोषण भारत छोडो, लिहू आंनदे!! डिजिटल वर्ग संकल्पना, बालवाचनालय निर्मिती व चालविणे. आर्यभट्ट गणित प्रयोगशाळा निर्मिती व उपयोग,ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य बनविणे. या वैशिष्ट्ये पूर्ण उपक्रमांची दखल घेऊन त्यांना सन 2020 चा ‘प्रयोगशील शिक्षक’ पुरस्कार दिला. या पुरस्काराबद्धल त्यांचे गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी,शिक्षण विस्तार अधिकारी विकास राजे,केंद्रप्रमुख मधुकर जंगम, लक्ष्मण महापुरे, शा.व्य. समितीचे अध्यक्ष संतोष जाधव, सरपंच शुभांगी पवार, उपसरपंच ,विकास पवार, पोलीस पाटील बाळासो पवार , जनार्दन मोहिते, रविंद्र पुणेकर, भीमराव पवार, प्रतापराव पवार, शहाजी पाटील, रुपाली लाकुळे, रजनी मोहिते यांनी अभिनंदन केले.