कुपवाड / प्रतिनिधी
तानंग ते मिरज रस्त्यावर महिन्यापूर्वी दुचाकीने एका दुचाकीला मागून जोराची धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गुलाब नबी मुलाणी (७८ रा.तानंग) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत शनिवारी रात्री कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित संदीप विश्वास आवळे (२३,रा.शास्त्रीनगर, कुपवाड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गुलाब मुलाणी १० फेब्रुवारी रोजी सकाळी तानंगहून मिरजेकडे मोटारसायकलवरून (एम.एच.१० बी.टी. ७९२०) जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकल (एम.एच.१० यु २३४९) चालक संदीप विश्वास आवळे याने जोराची धडक दिली. यात मयत मुलाणी गंभीर तर संदीप आवळे व त्याचा मित्र नयन शंकर आवळे हे किरकोळ जखमी झाले होते.
जखमीवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना गुलाब मुलाणी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित संदीप आवळे यांच्या विरोधात कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कुपवाड़ पोलिस करीत आहेत.