वार्ताहर / कुंडल
कुंडल(पलूस) व परीसरामध्ये वादळी वार्यासह पावसास सुरुवात झाली. तर जवळजवळ दहा ते पंधरा वर्षानंतर कुंडलकरांनी अनुभवला. गारांचा पाऊस हा पाऊस ऊस पिकासह अन्य पिकांना उपयुक्त असला तरी भाजीपाला व इतर फळ पिकांचे मोठ्या गारांमुळे नुकसान होणार असून खरड छाटणी घेतलेल्या द्राक्षपिकांचे कोवळ्या फुटी मोडणार आहेत.
रात्री ८.०० वा जोरदार वार्याबरोबरच मोठ्या गारा पडल्यानंतर ८.१५ वा दमदार पावसास सुरुवात झाल्याने बर्याच वर्षानंतर कुंडल व रीसरात दमदार अशा उन्हाळी पावसामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे चिंतेत असणारा बळीराजा व ऊन्हाने हैराण झालेल्या ग्रामस्थांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.