53 ग्रॅम सोने घेऊन चोरटे पसार,मुख्य बाजारपेठेतील प्रकाराने व्यापारीवर्गात दहशत
दिघंची / वार्ताहर
ग्राहक बनून येऊन ज्वेलर्स मालकावर चाकूच्या सहाय्याने वार करून भरदिवसा ज्वेलर्स लुटल्याची घटना आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.
यावेळी झालेल्या झटापटीत शुभम ज्वेलर्स मधील रोहित भोसले या युवकाच्या मानेवर चोरट्यानी चाकूच्या धार नसलेल्या बाजूने वार करून व काउंटरची काच फोडून त्यामधील सोन्याचे दागिने असलेले दोन ट्रे घेऊन पोबारा केला. दिघंचीमधील मुख्य बाजारपेठेमध्ये भरदुपारी ही सशस्त्र धाडसी चोरी झाल्याने व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.