प्रतिनिधी / मिरज
अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन नात्यातील व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील नरवाड येथे घडली. पिडीत तरुणीच्या आईने मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी कुमार शिवाजी पाटील (रा. लक्ष्मीनगर, नरवाड) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कुमार पाटील आणि पिडीत अल्पवयीन मुलगी ही एकमेकांचे नातेवाईक असून, ते लक्ष्मीनगर येथे राहण्यास आहेत. 31 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सदर मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी कुमार याने घरातील हॉलमध्ये येऊन सदर मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच ठार मारण्याची धमकीही त्याने दिली.
घडल्याप्रकारानंतर पिडीत तरुणीने आपल्या आईलाला सर्व हकीकत सांगितली. पिडीत मुलीच्या आईने मिरज ग्रामीण पोलिसात कुमार पाटील याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला ठार मारण्याची धमकी दिल्याने कुमार याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.