प्रतिनिधी / शिराळा
नाटोली ता. शिराळा येथील शेतकरी आनंदा ज्ञानू भोसले (वय -४६) यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली आहे. ते ऊसाला पाणी पाजण्यासाठी नदी जवळच्या शेतात गेले असताना हा अपघात घडला. याबाबत शिराळा पोलिसात अशोक ज्ञानू भोसले यांनी वर्दी दिली आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, मृत आनंदा ज्ञानू भोसले हे आपल्या नाटोली येथील मळीच्या शेतात पाणी पाजण्यासाठी गेले होते. आज (दि . १९) रोजी सकाळी त्यांना विद्युत मोटारीचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय शिराळा येथे नेण्यात आले परंतु त्यांना मृत घोषित केले.