प्रतिनिधी / सांगली
पद्माळे ता. मिरज मध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने क्यूआर कोडच्या माध्यमातून कर वसुली सुरू करण्यात आली आहे. करभरणा करण्यात होणारी टाळाटाळ कमी करण्याच्या उद्देशाने पद्माळे ग्रामपंचायतीने ही नवी संकल्पना राबवली आहे. ग्रामस्थांसाठी हा क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे घरात बसूनच पाणीपट्टी व घरपट्टी भरता येणार आहे.
या उपक्रमाचा ग्रामपंचायतीत शुभारंभ झाला. यावेळी सरपंच संजय कांबळे, उपसरपंच सचिन जगदाळे, सदस्य संजय जगदाळे, जयसिंग गुरव, ग्रामसेवक अमित पाटील तसेच क्लार्क राजेंद्र गणेशकर यांनी ग्रामपंचायतीत क्यूआर कोड लाँच केला. यामुळे ग्रामस्थांचा पंचायतीत येऊन पैसे भरण्याचा वेळ वाजणार आहे. नव्या पिढीतील मुले सर्व व्यवहार ऑनलाईनच करतात ते सहसा पंचायतीत येत नाहीत ही त्याची अडचण लक्षात घेऊन क्यूआर कोडची संकल्पना राबविली आहे.
यावेळी सरपंच व ग्रामसेवक म्हणाले, आता हे क्यूआर कोड गावातील सर्व व्हॉट्स ग्रुप वर पाठवणेत येणार आहे. तसेच मागणीनुसार ही ते संबंधित लोकाना व्हॉट्स ॲप पाठवणेत येणार आहे. व ग्रामपंचायतीचा कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केले जातील. यामुळे लगेच पैसे भरणे आता ग्रामस्थाना शक्य होणार आहे क्यूआर कोड वरील व्यवहाराचा पावत्या घरपोच केले जातील. यामुळे घरपट्टी पाणीपट्टी भरण्याला प्रोत्साहन मिळेल व ग्रामपंचायतीची वसूली चांगली प्रकारे होऊन उत्पादनात वाढ होईल असे मत मांडले.