प्रतिनिधी / पलुस
कोरोना बाधित रुग्णाची रुग्णवाहिकेवर चालक म्हणुन नेमणूक करण्यात आल्याने पलुस तालुक्यात खळबळ उडाली. पलुस तालुक्यातील घोगाव येथिल संदिप पाटील यांनी हा प्रकार प्रशासनासमोर उघड केला. व संबंधित चालकास कामावर घेणारे ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की धनंजय रामचंद्र पाटील (रा.घोगाव) यांची दि. ५ मे रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तरी देखिल तु कामवर ये असे सांगण्यात आले. या बाबात प्रशासनास काहीच माहिती नव्हते. ज्यावेळी संदिप पाटिल यांनी प्रशासनाचे डोळे उघडले त्यावेळी मात्र पायाखालची वाळु सरकली. ताबडतोब त्या चालकास घरी पाठवण्यात आले व संबंधित ठेकेदारावर कारवाईचे आदेश देण्यात आले.
याबाबत प्रशासनाकडुन सांगण्यात आले की हा चालक दि. ६ मे रोजी कामावर हजर झाला होता. त्याने एकाही रुग्णाची वाहतुक केलेली नाही. त्याने रुग्णवाहिकेतुन औषध पुरवठा केला आहे. त्यानंर हा प्रकार लक्षात येताच चालकास कामावर न येण्याच्या सुचना दिल्या आहेत. व ठेकेदारास कारवाईची नोटीस काढण्यात आली आहे.