वार्ताहर / कुंडल
पलूसला उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आ.अरुण लाड यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज मुंबई येथे भेट घेतली.
यावेळी त्यांनी पलुसमधील सध्याचे ग्रामीण रुग्णालय लोकसंख्येच्या दृष्टीने तसेच वाढत्या कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे कमी पडत आहे. तसेच येथे उपलबद्ध सोयी सुविधा अपुऱ्या पडत असून जर उपजिल्हा रुग्णालय पलुसला झाले तर रुग्णालयातील वैद्यकीय सेवा-साधने, डॅक्टर्स, वॉर्ड- खाटांची संख्या वाढेल यामुळे पलुस तालुक्यातील गरीब गरजू रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ व पैसा वाचेल व पलूसमध्येच मोफत व कमी खर्चात वैद्यकीय सेवा मिळेल यासाठी पलूस उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी आ.अरुण लाड यांनी आरोग्यमंत्रांकडे केली.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या तात्काळ मंजुरीसाठी प्रयत्न करु असे अश्वासीत केले. या वेळी जि.प. सांगली गट नेते शरद लाड उपस्थित होते.