पोलिस खात्याला फासला काळीमा
इस्लामपूर : प्रतिनिधी
येथील पोलिस ठाण्याकडील पोलिस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (३४रा.राजेबागेश्वर) याने महाविद्यालयीन तरुणास त्याचे प्रेम प्रकरण उघडकीस आणण्याची धमकी देत व पैशाची मागणी करत अनैसर्गिक अत्याचार केला. या अनैसर्गिक कृत्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना दि.२९ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. या विकृत पोलिस कर्मचाऱ्यामुळे पोलिस खात्याला काळीमा फासला आहे.
इस्लामपूर पोलिस ठाण्यात नेमुणकीस असलेला पोलिस कर्मचारी हणमंत देवकर दि.२७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता पेट्रोलिंग करीत असताना पिडीत मुलगा हा त्याची मैत्रिणीस भेटून पुन्हा त्याचे वस्तीगृहात जात असताना आरोपी हणमंत देवकर व एक पोलिस कर्मचारी यांनी त्याला अडवून त्यास “आत्ता कोठून आलास इथे काय करतो” असे विचारले असता पिडीत याने मैत्रिणीला भेटून आलो आहे असे सांगितले. त्या तरुणास ब्लॅकमेल करत तुझ्या घरच्यांना व त्या तरुणीच्या घरी सांगेण म्हणत अनैसर्गिक कृत्य केले. देवकर याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.