प्रतिनिधी / सांगली
रेल्वे स्टँड आणि एसटी स्टँड परिसरात नशा करून प्रवाशाची लुटमार करणाऱ्या तिघा नशेखोर तरुणांना गुरुवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. रियाज बदेसाब शेख (वय २९), वसीम राजू दिग्रजे (वय ३३) आणि तरबेज अहमद शेख (वय २८, सर्व रा. ख्वाजा वसाहत झोपडपट्टी, मिरज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
संशयित तिघांनी मंगळवारी रात्री दारू आणि गांजाची नशा करून स्टेशन परिसरात हैदोस घातला होता. प्रवाशांची अडवणूक करून मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेण्यात आली होती.