पुलाची शिरोली/वार्ताहर
इंडिका कारची डिव्हायडरला धडक बसून दोन ठार. करण रमेश पोवार रा. रामानंदनगर व सुरज सदाशिव पाटील संभाजी नगर कोल्हापूर असे मयत व्यक्तींची नावे आहेत.हा अपघात शुक्रवारी रात्री सव्वाअकरा वाजता मार्बललाईन (सांगली फाटा) येथील टोलनाक्याच्या शेडजवळ घडला.
घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरज पाटील याचा स्क्रॅपचा व्यवसाय होता. त्याची वसुली करण्यासाठी हे दोघेजण इंडिका विस्टा कारमधून इचलकरंजी जयसिंगपूर येथे शुक्रवारी सकाळी गेले होते. तेथून राञी उशिरा ते कोल्हापूरला येत होते. दरम्यान ते मार्बल लाईन जवळ आले असता टोल वसुलीसाठी बांधलेल्या शेडच्या डिव्हायडरला भरधाव कारची धडक बसली. ही जोराची धडक बसून करण पोवार हा जागीच ठार झाला तर चालक सुरज पाटील हा गंभीर जखमी झाला. जखमीस तत्काळ कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण तो शनिवारी सकाळी उपचार सुरू असताना मयत झाला.
या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. स.पो.नि.किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.