प्रतिनिधी / सांगली
बुधगाव नगरीस हजारो वर्षांचा इतिहास आहे. या गोष्टीचे चिंतन करून बुधगावमधील सामाजिक कार्यकर्ते व जिव्हाळा फौंडेशनचे अध्यक्ष प्रशांत मुळीक यांनी जिव्हाळा फौंडेशन संचलित बुधगाव इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली आहे.
यासाठी माधवराव पटवर्धन सरकार व अॅड. गौरव शेंडे सरकार हे मार्गदर्शक आहेत. या मंडळात महादेव कवठेकर, बाळकृष्ण वसवाडे, सौरभ गोकावे, धनंजय गायकवाड, गजानन मोरे, जयवंत पाटील, विजय उंटवाले, श्रीकांत कारंडे, मनोजकुमार मुळीक, महादेव चव्हाण, माजी सैनिक नारायण जाधव, विनायक शिंदे, रवींद्र शेवाळे, अनिल शिरोले, गुणाजी गोसावी, गोपाळ चव्हाण, गजेंद्र टेके, संजय कडते, अनिकेत पवार, संकेत लठ्ठे, हर्षवर्धन पाटील, सिद्धार्थ गोकावे, अथर्व कवठेकर इत्यादी लोक सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
ऐतिहासिक बुधगांवच्या इतिहासाचा उलघडा करणे व येणाऱ्या नवीन पिढीसमोर बुधगांवचा इतिहास मांडणे हा उद्देश या मंडळाचा आहे.