प्रतिनिधी / सांगली
महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी उभा करण्यात आलेली बेवारस वाहने हटविण्यास महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने सुरुवात केली आहे. ही वाहने महापालिक ताब्यात घेणार आहे.
काही दिवसांपूर्वी वाहन मालकांना तशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष केल्याने कारवाईचा बडगा उगरण्यात येत आहे. उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलनचे अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.