सांगली / प्रतिनिधी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी सांगलीत भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नाना पटोले हे पंतप्रधानांना उददेशून घाणेरडी टीका करत असून ते एका गावगुंडासारखे बोलत आहेत, पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन केले. त्यानुसार सांगलीमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेताल वक्तव्या विरोधात तीव्र जाहीर निषेध करत प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत असे परत झालेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नानांना त्यांची जागा दाखवतील आणि होणाऱ्या परिणामास महाविकास आघाडी जबाबदार असेल असे आंदोलन वेळी सांगण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, संघटन सरचिटणीस दीपक माने, गटनेते विनायक सिंहासने, सरचिटणीस अविनाश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक आनंदा देवमाने, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, नगरसेविका कल्पना कोळेकर, अप्सरा वायदंडे, सविता मदने, गीतांजली ढोपे -पाटील, संयोजिका दिव्या कुलकर्णी, प्रीती मोरे, विश्वजीत पाटील, रविंद सदामते, गणपती साळुंखे, स्वप्निल शहा, महेश सागरे, श्रीकांत वाघमोडे, अमित भोसले, रविंद ढगे, राजू मद्रासी, गौस पठाण, गणपती साळुंखे, विशाल मोरे, शांतीनाथ कर्वे, अनिकेत खिलारे, शीतल कर्वे, प्रथमेश वैद्य, कयूम शेख, विनोद पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.