भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय पथकाने केली तपासणी.
भिलवडी / वार्ताहर
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज सांगली व भारती ग्रामीण रुग्णालय तुरची फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी येथील पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय पथकामार्फत भिलवडी येथे नुकतीच करण्यात आली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तसेच लॉक डाऊन दरम्यान देशभरात संचारबंदी लागू असल्याने, पोलिसांना २४ तास तटस्थपणे आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावरती कामाचा ताण वाढत आहे. सदर बाबींचा त्यांच्या आरोग्यावरती कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज सांगली व भारतीय ग्रामीण रुग्णालय तुरची फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी तालुका पलुस येथे भिलवडी पोलीस ठाण्यातील सुमारे ४० पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, रक्तातील साखरेचे प्रमाण, ब्लड प्रेशर तसेच शरीरातील टेंपरेचर याची तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणीसाठी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज सांगली व भारती ग्रामीण रुग्णालय तुरची फाटा या रुग्णालयातील डॉ. मीनाक्षी सावंत, डॉ. गौरी गलंगे, पद्मा कुंभार, प्रियांका मोहिते, पप्पू सावंत, जुलेखा नदाफ व संजीवन कदम यांच्या वैदयकिय पथकाने सहभाग घेतला.