जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि आ. मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत झाली बैठक
प्रतिनिधी / शिराळा
सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज पुतळा व स्मारक उभारणी आदी कामाबाबतच्या विकास आराखड्यावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली.
बैठकीत किल्ल्यावर सुशोभीकरण करणे, शौर्य वाडा उभारणे व त्यात छ. संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शिल्पचित्र घटनाक्रम तयार करणे तसेच वाडयाबाहेर संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे हे मुद्दे चर्चेत होते. वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी तयार केलेल्या विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. आवश्यक बदल सुचविण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर, उप अभियंता अतुल केकरे, नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, शिराळा नगरपंचायत मुख्याधिकारी योगेश पाटील, राजेंद्र निकम, बसवेश्वर शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.