सांगली : प्रतिनिधी
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, नगरसेवक युवराज बावडेकर, मंगेश चव्हाण , नगरसेविका भारती दिगडे, पाणीपुरवठा अभियंता सुनील पाटील, सिस्टीम मॅनेजर नकूल जकाते, मध्यवर्ती निदान केंद्राचे प्रमुख काका हलवाई, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, कमलाकर कुलकर्णी, दिनेश जाधव, भारती माळी, वैशाली सुर्यवंशी आदींसह मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.