तेरा अर्ज दाखल ; गुरुवारी चित्र स्पष्ट होणार
प्रतिनिधी / सांगली
सांगली महापालिकेच्या प्रभाग १६- अ मधील पोट निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर विरोधी भाजपकडूनही अर्ज दाखल करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्याचे सांगत भाजपने काँग्रेसच्या बिनविरोधाच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे.
रणजित जाधव (शिवसेना व अपक्ष), अमित पवार (अपक्ष), उमरफारूक ककमरी (वंचित आघाडी), सुरेश सावंत (अपक्ष), संदीप पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), समीर सय्यद (अपक्ष), अमोल गवळी (भाजप), महेंद्र चंडाळे (शिवसेना), नईम शेख (शिवसेना), तौफिक शिकलगार (काँग्रेस), इरफान शिकलगार (काँग्रेस) व उमर गवंडी (राष्ट्रवादी) अशी उमेदवारांची नावे आहेत. उद्या मंगळवार ४ जानेवारी रोजी छाननी, तर गुरुवार ६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यन्त अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.