उपचार सुरू असताना सहा जणांचा मृत्यूः 282 जण कोरोनामुक्तः
प्रतिनिधी / मनपा क्षेत्रात 22 तर ग्रामीण भागात 148 रूग्ण वाढले
शनिवारी मनपा क्षेत्रात 22 तर ग्रामीण भागात 148 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे आजअखेर एकूण रूग्णसंख्या 44 हजार 39 झाली आहे. तर शनिवारी 282 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 40 हजार 299 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. उपचार सुरू असताना सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका क्षेत्रात 22 रूग्ण वाढले
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात नवीन 22 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 12 तर मिरज शहरात 10 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आटोक्यात येवू लागली आहे. आज अखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 882 रूग्ण झाले आहेत. यातील 91 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 148 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्राबरोबरच आता ग्रामीण भागातही कोरोनाची रूग्णसंख्या आटोक्यात येवू लागली आहे. शनिवारी ग्रामीण भागात नवीन 148 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात पाच, जत तालुक्यात 12, कडेगाव तालुक्यात 17, कवठेमहांकाळ तालुक्यात चार, खानापूर तालुक्यात 40 रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात 18, पलूस तालुक्यात आठ तर शिराळा तालुक्यात 13 रूग्ण आढळून आले आहेत. तासगाव तालुक्यात 14 तर वाळवा तालुक्यात 17 रूग्ण वाढले आहेत.
उपचार सुरू असताना सहा जणांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असताना सहा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कुपवाड शहरात एकाचा तर वाळवा तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यात तीन व्यक्तीचा तर आटपाडी तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 613 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
तीन हजार 421 जणांचे स्वॅब तपासले
जिल्ह्यात शनिवारी तीन हजार 421 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये आरटीपीसीतून एक हजार 206 तर रॅपीड ऍण्टीजनमधून दोन हजार 215 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये नवीन 170 रूग्ण आढळून आले आहेत.
परजिल्ह्यातील सहा रूग्ण वाढले
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावर जिल्ह्यात उपचार करण्यात येतात. शनिवारी सहा नवीन रूग्ण वाढले त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक, बेळगाव जिल्ह्यातील एक, रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आणि सातारा जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा रूग्ण वाढले. एकूण रूग्णसंख्या एक हजार 373 झाली आहे. तर त्यातील एक हजार 127 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 42 रूग्णांच्यावर उपचार सुरू आहेत. आजअखेर 204 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
कोरोनाची सध्यस्थिती
नवीन रूग्ण 170
उपचारात 2127
बरे झालेले 40299
एकूण 44039
मृत्यू 1613