वार्ताहर / म्हैसाळ
मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखानाचे चेअरमन, मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांची जिल्हा नियोजन कमिटीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचेवर राष्ट्रवादी काँग्रेससह विविध सहकारी संस्था सामाजिक संस्था व वैयक्तिक पातळीवर सत्कार व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी बोलताना मनोज शिंदे म्हणाले “आमचे मार्गदर्शक व नेते ना जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातुन आपणास जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. महापूराचा फटका तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी अधिका अधिक निधी उपलब्ध करून देऊन विकासासाठी निश्चितच पणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.