प्रतिनिधी / सांगली
सांगली येथून मराठा आरक्षण संदर्भात स्टॅन्ड फ़ॉर मराठा रिझर्वेशन या हैशटैगद्वारे काळे झेंडे दाखवून मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा निषेध काळे झेंडे दाखवून करण्यात आला.
मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर डिजिटल माध्यमातून राजकीय पक्ष मराठा समाजात दूही माजवत असल्याबाबत सर्वच राजकीय पक्षांचा निषेध करण्यात आला. मराठा समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी ही लढाई घराघरातून लढवायची तयारी मराठा समाज नक्की पक्ष विरहीत उभारेल. यामुळे सर्व राजकीय पक्षानी राजकारण बंद करुन मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन सकल मराठा समाज सांगली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनात सकल मराठा समाजाच्यावतीने पृथ्वीराज पवार,ए.डी.पाटील,सतिश साखळकर,अविनाश जाधव,आनंद देसाई,विश्वजीत पाटील, चेतन माडगुळकर,चेतक खंबाळे,अभिजीत शिंदे,अमृतराव सूर्यवंशी,विशाल लिपाने पाटील,धनंजय शिंदे,प्रशांत भोसले,दादासाहेब यादव,राहूल पाटील, इत्यादीसह जिल्ह्यातील मराठा बांधव सहभागी झाले होते.