प्रतिनिधी / आष्टा
वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी मधील मल्लिकार्जुन डोंगर मोठे पर्यटन स्थळ बनत चालले आहे. डोंगरावरील पुरातन मंदिरात भगवान महादेवांची पिंड आहे. मंदिरापर्यंत जाताना असणारा नागमोडी वळणाचा मार्ग, त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी, उंच डोंगर कडा, हिरवेगार झाडे, घनदाट जंगल, स्वच्छ परिसर, निसररम्य वातावरण इत्यादींमुळे पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
सध्याचे पावसाळी दिवस आणि डोंगरावरील आल्हाददायक वातावरण यामुळे सुट्टीच्या दिवशी मल्लिकार्जुन डोंगरावर पर्यटनासाठी लोक सहकुटुंब येताना दिसत आहेत. एक बाजूला डोंगरकडा तर दुसऱ्या बाजूला असणारे घनदाट झाडे तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहेत.