प्रतिनिधी / सांगली
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुट्टीदिवशी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन स्वच्छता मोहीम राबवली. प्रत्येक महिन्यातून एक दिवस कार्यालयीन स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील व राहुल रोकडे यांनी सांगितले.
या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील महापालिकेच्या कार्यालयामध्ये साफसफाई कचरा उठाव आणि औषध फवारणी याबरोबरच दप्तराची मांडणी नीटनेटकी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.