प्रतिनिधी / सांगली
शिंदेमळा येथील आशीर्वाद हॉस्पिटलकडून महापालिकेच्या नव्याने सुरू झालेल्या कोविड हेल्थ सेंटरला सेवाभावीवृत्तीने चार व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले.
महापालिकेने शहरातील दानशूर व्यक्ती आणि आस्थापना यांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यास आशीर्वाद हॉस्पिटल चे डॉ. सुधीर गवळी आणि डॉ. उज्वला गवळी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोविड हॉस्पिटल येथे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्हेंटिलेटर स्वीकारले. यावेळी आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉ. सुधीर गवळी, डॉ. उज्वला गवळी, मनपाचे आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ रवींद्र ताटे, मनपाचे कामगार अधिकारी अनिल चव्हाण, कार्यशाळा प्रमुख विकास पाटील उपस्थित होते. यावेळी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेऊन आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना ज्याची खूप गरज आहे अशा वस्तू मिळवून देण्यात प्रशासनाला सहाय्य करावे, असे आवाहन डॉ. गवळी यांनी केले.
दरम्यान सांगलीच्या 100 फुटी परिसरातील खोत हॉस्पिटलकडून मनपाच्या कोविड हॉस्पिटलला 20 पीपीए किट देण्यात आले. खोत हॉस्पिटलचे डॉ. रोहित खोत यांनी मनपा आयुक्त यांचेकडे हे किट सुपूर्द केले.