सांगली/प्रतिनिधी
महापुरामध्ये सांगलीकर जनतेच्या मदतीला बोटीसह धावून आलेले करमाळा येथील शंकर माने यांना सांगली महापालिकेच्या मालमत्ता आणि कर विभागाने मदतीचा हात पुढे केला आहे. या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी माने यांच्यासाठी 40 हजारांची मदत गोळा केली असून ती मदत मुस्तफा मुजावर यांच्याकडे सुपूर्त केली.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता आणि कर विभागाने महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन करमाळा येथील शंकर माने यांना 40 हजार रुपयाची आर्थिक मदत केली. यावेळी कर संकलक व निर्धारक नितीनकाका शिंदे, बाळासो मलेवाडी, राजू जमादार, सुहास व्हटकर आदी उपस्थित होते.