जिल्हा पोलीस प्रमुख यांचा ॲक्शन प्लॅन तयार, आत्तापर्यंत पंचवीस गुन्ह्यात 51 सावकारांना ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी / मिरज
सांगली जिल्ह्यात फोफावलेल्या खासगी सावकारीचा कायमस्वरूपी बिमोड करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांनी ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने सांगली-मिरजेतील खाजगी सावकारांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 25 खासगी सावकारी प्रकरणात 51 खासगी सावकारांवर गुन्हे दाखल करून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सांगली मिरजेतील काही व्यवसायिकांनी व सर्वसामान्य नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या असून, नागरिकांच्या तक्रारी नुसार सांगली-मिरजेतील खाजगी सावकार पोलिसांच्या हिटलिस्टवर आले आहेत.