केंद्रीयमंत्री नितिन गडकरींकडून हिरवा कंदील, आमदार खाडेंसह सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी / मिरज
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि मंजूरीशिवाय रेंगाळलेल्या शहरातील शिवाजी रस्त्याचा तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी 27 कोटी, 49 लाख रुपयांच्या निधीला मंजूरी दिली असून, शुक्रवारी महामार्ग प्राधिकरणाकडून राज्य शासनातील संबंधीत विभागाला मंजूरीचे पत्र प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 च्या तानंग फाटा ते शास्त्री चौक अशा 10.8 कि.मी. च्या रस्ता कामास लवकरच सुरूवात होणार आहे. दरम्यान, या रस्त्यासाठी आमदार सुरेश खाडे यांच्यासह मिरज शहर सुधार समितीने पाठपुरावा केला होता. अखेर रस्ता कामाला मंजूरी मिळाल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.