प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील रेवणी गल्ली परिसरात घोरपडीची तस्करी करणाऱ्या दोघांना पीपल्स फॉर अॅनिमलच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या ताब्यातील एक घोरपड जप्त केली आहे. तर एक घोरपड त्यांनी नष्ट केली असल्याचे समजते.
या तस्करी प्रकरणी बाबा अब्दुल शेख (वय 40), राजाभाऊ सुंदर केदार (वय 36 रा. दोघे रा. एकोरगाव, जि. बीड) या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोघे रेवणी गल्ली येथे घोरपड या प्राण्यांची तस्करी करण्यसाठी आले असल्याची माहिती पीपल्स फॉर अॅनिमलच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर अॅड. बसवराज होसगौडर, अशोक लकडे आणि नदाफ यांनी सापळा लावून त्यांना पडकले. त्यांना मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडील एक घोरपड ताब्यात घेतली आहे. तर एक घोरपड त्यांनी नष्ट केला असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.