प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील दिंडीवेस मालगाव रोड झोपडपट्टी भागात राहणाऱ्या शब्बीर रमजान नदाफ (वय 36) या तरुणाने शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील नातेवाईकांशी किरकोळ वाद झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद झाली आहे.