मिरजेच्या तरूणाचा निर्घृण खूनकाळ्या खणीजवळ डोक्यात दगड घालून केला खून
प्रतिनिधी / सांगली
शहरातील काळ्या खणीजवळील मिरज येथील टाकळी रोडवरील मोळके प्लॉट येथील प्रदीप राजू हंकारे वय 24 या तरूणाचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. हा खून काळ्या खणीच्या पाणी उपसा केंद्रापासून 50 फुटाच्या अंतरावर आढळून आला. घटनास्थळी मयत प्रदीप याची दुचाकी पडली होती. तर मृतदेहापासून पंधरा ते वीस फुटाच्या अंतरावर रक्ताने माखलेले तीन मोठे दगड आढळून आले आहेत.
पहाटे हा खून उघडकीस आल्यानंतर या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी याची माहिती विश्रामबाग पोलीसांना दिली. विश्रामबाग पोलीसांना तात्काळ याठिकाणी येवून या खूनाची पहाणी करून पंचनामा केला. या खूनाची माहिती समजताच याठिकाणी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. हा मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकातील कैलास वडर, राजू कांबळे, महेश गव्हाणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तो मृतदेह वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. या खूनाची खबर मिळताच पोलीसांनी तात्काळ आपली तपास सुरू केला आहे.