दोन महिलांसह सहा जणांवर गुन्हा
प्रतिनिधी/मिरज
पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन सहा जणांनी अभिजीत विलास अलकुटे (वय 29, रा. सांगलीवसे, केसरीवाडा, मिरज) या तरुणावर धारदार चाकूने खुनी हल्ला केला. पोटावर आणि कमरेवर धारदार चाकूने भोसकून दगडानेही मारहाण केल्याने अलकुटे याची प्रकृती गंभीर आहे. याबाबत त्याने शहर पोलिसात फिर्याद दिली असून, सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शकुंतला वडर, लक्ष्मी कुडाळकर या दोन महिलांसह अविनाश कुडाळकर, अजय कुडाळकर, बाळासा पवार, अजय कुडाळकर (सर्व रा. मिरज) यांचा समावेश आहे. सदर सहा जणांनी संगनमत करुन मारहाण केल्याचे जखमी अभिजीत अलकुटे याने फिर्यादीत म्हटले आहे.