खड्डयात आदळून दुचाकीचा अपघात, एक ठार, एक गंभीर
कुपवाड / प्रतिनिधी
मिरज एमआयडीसी परिसरातील बहुतांश रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. याच खड्डयांच्या रस्त्याने एका दुचाकीस्वाराचा बळी घेतला. खड्डयात आदळून दुचाकीचा अपघात झाल्याने यात एकजण ठार तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
शनिवारी रात्री अपघात झाला असून या घटनेची कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे. यामध्ये सूरज तानाजी कोळी ( वय २४,रा.म्हैसाळ) याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र विजय गिड्डे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.