प्रतिनिधी / मिरज
शहरातील यशवंत शिक्षण संस्था संचलित मिरज महाविद्यालयात सर्व वर्गाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घातलेली बंदी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी उठविली आहे. त्यामुळे सर्व वर्गाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मिरज महाविद्यालयात आता प्रथम वर्ग आर्टस, सायन्स ऍन्ड सायन्स, बी.सीए. एम.एससी. आणि एमए या वर्गांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही प्रा. पाटील यांनी सांगितले.