प्रतिनिधी / शिराळा
वाकुर्डे खुर्द ता. शिराळा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी प्रवेश केला. प्रवेश केलेले माजी ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव यांचेसह रामचंद्र, नामदेव, संजय, युवराज व मारुती जाधव यांचा प्रवेशनिमित्त स्वागत व सत्कार आमदार मानसिंगराव नाईक यांनी केला.
जुन्या व नवीन कार्यकर्त्यांनी मिळून एकत्रितपणे सार्वजनिक व लोकहिताची कामे करावीत, अशी अपेक्षा यावेळी आमदार मानसिंगभाऊ यांनी व्यक्त केली. यावेळी संचालक डॉ. राजाराम पाटील, दीपक जाधव, हणमंत, आनंदा, आप्पासो व संजय पाटील, वसंत, बाबासो, शंकर, प्रकाश, आकाराम व अविनाश जाधव आदी उपस्थित होते.