प्रतिनिधी / कुपवाड
कुपवाडच्या प्रभाग दोनमधील वाघमोडेनगर विस्तारीत भागात नगरसेवक गजानन मगदुम यांच्या प्रयत्नामुळेच अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईन कामास खऱ्या अर्थाने मंजूरी मिळाली. त्यामुळे येथील भागाचा पाणीप्रश्न सुटला असून आता मुबलक पाणी मिळणार, असे प्रतिपादन नगरसेवक गजानन मगदुम यांनी केले.
विस्तारीकरणामुळे पुर्वी टाकण्यात आलेल्या पाईपलाईन अपुर्या पडत आहेत. यासाठी काही दिवसापुर्वी मुख्य आठ इंची पाइपलाईन कुपवाड पाण्याची टाकी ते दत्ता पाटोळे यांच्या घरापर्यंत पाईप टाकुन मायाक्का मंदीर या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यात आला होता. त्याचप्रमाणे वाघमोडेनगर भागातील अंतर्गत गल्ली मधील पाईप लाईन टाकणेबाबत २० जून २०१९ पासुन पाईप लाईनचे काम प्रस्तावित केले होते.
आयुक्तांनी सदर भागाची पाहणी करुन कामाची आवश्यकता पाणी पुरवठा अधिकार्यांना दाखवणेत आली. त्यास आयु्कतांनी मान्यता दिली होती. वाघमोडेनगरच्या विस्तारित भागातील पाईप लाईन टाकण्यास सुरवात होणार आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामे मंजुर असल्यामुळे भागात पाईपलाइन टाकण्याचे काम आज तातडीने सुरु करण्यात आले. या कामाचे उदघाटन नगरसेवक गजानन मगदुम यांच्याहस्ते व येथील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.