प्रतिनिधी /इस्लामपूर
शहरासह वाळवा तालुक्यात मंगळवारी ७९ इतक्या उच्चांकी संख्येने रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासन व वैद्यकीय विभागावरील ताण अधिकच वाढला आहे. यामध्ये शहरातील १९ रुग्णांचा समावेश आहे.
गेल्या १५ दिवसांपासून रुग्ण संख्या वाढत आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. गाववार रुग्ण असे- तांदूळवाडी ११, इटकरे ४, वाघवाडी ३, कामेरी 9. येडेनिपाणी ७. कासेगाव ७, पेठ १, वाळवा ५, शिगाव १, शिरटे १, करंजवडे कुरळप १, चिकुर्डे १, आष्टा २, बोरगाव २, दुधारी १, मसूचीवाडी, ताकारी १, कापूसखेड १, मालेवाडी १, गेल्या तीन दिवसांपासून प्रशासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याची अंमलबजावणीही काटेकोर झाली. तरी देखील शहरात रुग्ण संख्या वाढत आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागात ही काही गावे हॉटस्पॉट बनत आहेत.
कोरोनाची रुग्ण संख्या व साथीच्या रोगांची रुग्ण संख्या यामुळे आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. नगरपालिकेने सहा ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिना कोरोना रुग्णांवर तात्काळ उपचार होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.