वार्ताहर / वाळवा
वाळवा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचे व वाळवा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या नेत्याचे तासगाव रस्ता येथील तसेच हाळभाग येथील डिजिटल पोस्टर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने तणावाचे वातावरण गावात तयार झाले आहे.
सोमवार दि. २९ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पोस्टरवरील या नेत्यांचे पोस्टर फाडले आहे. हाळभाग येथे एका कॉर्नरवर असलेले पोस्टर जाळण्याचाही प्रयत्न झाला आहे. त्या पोस्टरवरील या नेत्याचे डोके फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला असुन, गावातील या नेत्याने आष्टा पोलीसात तक्रार दिली आहे.
पोलीस निरिक्षक सिद व सहकारी पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तणावाचे वातावरण पाहुन आष्टा पोलीसांनी लगेच भेट देऊन परिस्थिती हताळली, ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या नेत्याच्या कार्यकर्त्यांची यापुर्वीही गावात अनेकदा बाचाबाची, मारामारी झाली आहे. राजकारणात वरचड ठरू लागल्याने हा प्रकार झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आष्टा पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गावात मोठया प्रमाणावर विकासकामे सुरु केली आहेत. त्यामुळेही राजकीय वर्चस्व वाद निर्माण झाला असु शकतो.